ग्रामपंचायत शिरगांव

ता.कडेगाव, जि. सांगली.

(स्थापना १९५८)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

मौजे शिरगाव येथे विठोबा आपा गोसावी हे भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी ताम्रपट भिक्षेत टाकले. नंतर ते मोडी अक्षरात असल्यामुळे ते वाचता येत नाही ते वाचण्यासाठी पन्हाळगाडचे ब्रम्हान वाचण्यास लावले असता त्यावरती सागरेश्वर देवस्थानची ९९९ एकर जमीन इमान म्हणऊन दिली होती. तो इथे येऊन सागरेश्वर ची पूजा अर्चा करून भक्ती करत होता व तो रोज गावामध्ये घाठाखालील व घाटावरील १८ गावातीमधील भिक्षा मागून मिळालेल्या भिक्षेतून नैवद्य दाखवत होते.

इतकी जमीन आपणाला काय करायची म्हणून त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे सोनहिरा ओढ्याच्या काठावर शिरगाव गावची स्थापना १८ व्या शतकात झाली. गावामध्ये प्रथम माळी, माने व इतर १२ बलुतेदार व इतर समाज यांना सर्वांना जमिनीची वाटणी करून दिली. तसेच शिरगाव येते सर्वसेवा सोसायटीची स्थापना झाली त्याचे चेअरमन वसंत कृष्णा गुळवणे यांना प्रथम घ्ण्याचा मान मिळाला तसेच विठोबा आप्पा गोसावी हे भिक्षा मागून नैवेद्य द्याचे त्यांनी देवाला सांगितले माझे घरी जेवालया या पण देवाने १ अट घातली की तू मागे वळून पाहू नको जिथे मागे बघशील तिथे मी थांबेन.  त्यावेळी सागरेश्वर महाराज जेवालया येत असताना पुढे गोसावी व मागे देव येत होते त्यांना असा भास झाली की, ओढ्याला जास्त पाणी आले आहे म्हणऊन त्यांनी मागे वळून पाहिले व तिथेच ओढ्याच्या कडेला निवडूंगच्या झाडाखाली देव सुप्त झाले सागरेश्वर उत्तरेस असल्यामुळे त्यास उत्तरेश्वर हे नाव पडले.

सोनहिरा ओढ्याच्या पात्रात वाहत आलेली हनुमान मूर्ती होती. काही कालावधी नंतर मूर्ती उघडी झाली. त्यावेळी देवराष्ट्रे मधील काही लोकांनी मूर्ती घेऊन जायचा प्रयत्न केला व तसेच मूर्ती घेऊन जाण्यासाठी बैलगाडीचा उफयोग केला.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

तक्रार निवारण विभाग

Contact Form Demo
Scroll to Top